कसं काय साहेब खरं आहे का.. ? हदगाव येथे तुमच्यासाठी राहायची व्यवस्था असताना नांदेड येथून अपडाऊन करणं बर आहे का …
गजानन जिदेवार आष्टीकर तालुका प्रतिनिधी हदगाव
हदगाव उपजिल्हा रुग्णालयात सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदस्थापना असून केवळ पाचच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत त्यातच उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी हृदयरोग तज्ञ नसणे ही गंभीर बाब असून उपजिल्हा रुग्णालयात हृदयरोग तज्ञ असावा यासाठी वैद्यकीय अधीक्षक या नात्याने डॉ. दरबस्तवार यांनी कुठलेही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाहीत .त्याचबरोबर प्रशासन नीट चालवण्याच्या नावाखाली रुग्णांची मात्र मोठ्या प्रमाणात हेळसांड होताना दिसून येत आहे. अलीकडच्या काळात हृदयाच्या आजाराचे प्रमाण वाढलेले दिसतांनाच सर्वसामान्यांचा ओढा उपजिल्हा रुग्णालयात असतो .त्यातच प्राथमिक उपचार म्हणून इसीजी काढल्या जातात परंतु इसीजी मशीनच धुळखात पडून असून इसीजी तंज्ञच नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागते ही बाब गंभीर असून वैद्यकीय अधीक्षकांचे मात्र यावर दुर्लक्ष असल्याचे दिसून येत येत आहे. त्याचबरोबर रुग्णालया एक्स-रे मशीन आहे. तसेच मशीन हाताळणारा कर्मचारी असताना सुद्धा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना एक्स-रे कक्ष हा बंद अवस्थेत दिसून येतो. त्यामुळे कर्मचारी नावालाच आहे की काय अशीही चर्चा यानिमित्ताने होताना दिसून येत आहे. तसेच रुग्णालयाच्या परिसरात नगर परिषदेच्या माध्यमातून शौचालय ची उभारणी करण्यात आली परंतु हे शौचालय घाणीच्या साम्राज्यात सापडले असून परिणामी या शौचाल्यामुळे रुग्णालयात आलेल्या रुग्णांना त्या जंतूमुळे आजाराचा सामना करावा लागत आहे ही बाब वास्तव असून याची साफसफाई कोण्या यंत्रणेकडे आहे ही बाब दुय्यम असून या शौचालयाच्या साफसफाईसाठी रुग्णालय प्रशासनाने कुणाला सूचना केल्यात का असाही प्रश्न पुढे येत आहे. असे असताना देखील वैद्यकीय अधीक्षकांना याचे कुठलेच गांभीर्य नाही. ही बाब गंभीर आहे अशी ही चर्चा रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. वैद्यकीय अधीक्षकांचे शासकीय निवासस्थान नावालाच. उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात लाखो रुपये खर्च करून वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी निवासस्थान बांधण्यात आले आहे. या निवासस्थानात मागील अनेक वर्ष वैद्यकीय अधीक्षक आपल्या परिवारासह राहात असत परंतु नव्यानेच आलेले वैद्यकीय अधीक्षक त्या निवासस्थानात न राहता नांदेड वरून अपडाऊन करतात त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले ते निवासस्थान आता नावालाच का? अशी चर्चा होत असताना वैद्यकीय अधीक्षकच जिल्ह्यावरून ये जा करतात मग आम्ही का नाही असाही प्रति सवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.चौकट : हदगावचे उपजिल्हा रुग्णालय पन्नास बाटांचे असून शहराची वाढती लोकसंख्या नाहता उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांचेच कर्णधार वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर संदीप दरबस्तवार हेच नांदेड वरून अपडाऊन करत असल्याने रुग्णांची हेळसांड होत असून प्रशासनही कमकुवत बनल्याने हदगाव चे उपजिल्हा रुग्णालय ‘शो – पीस’ बनल्याचे बोलले जात आहे.


