देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मौजे हसनाबाद या ठिकाणी यादी भाग ५९ श्री दत्तात्रेय वाडेकर सर यांच्याकडे एकूण ८०१ मतदार असून श्री भास्कर पठाडे सर यादी भाग ६० यांच्याकडे ७८० मतदार आहेत ,श्री अमोल चौरपगार सर यादी भाग ६१ यांच्याकडे १४५० श्री सुनील चव्हाण सर यादी भाग ६२ यांच्याकडे एकूण १४८० मतदार असून. मतदानाचा टक्का वाढावा व सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्व मतदारांना घरपोच मतदान पावती वाटण्याचं काम बीएलओ करीत आहे. सर्व वाडी ,वस्ती व दुर्गम भागात जाऊन स्वतः संध्याकाळ पर्यंत पोल चीट वाटप करत आहे. जवळपास 70 ते 80 टक्के वाटप आजपर्यंत झाले आहे असे जेवखेडा बुद्रुक जि प केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख श्री. यशवंत जोशी व हसनाबाद जि प केंद्राचे केंद्रप्रमुख श्री दत्ता जिवरग सर यांनी कळविले आहे.