मारोती एडकेवार
सर्कल प्रतिनिधी,सगरोळी
सगरोळी ते आदमपूर हा रस्ता दोन्ही राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणारा रस्ता आहे त्या रोडवरती तीन फुटाचे खोल अशा पद्धतीचे अनेक खड्डे पडल्या गेले आहेत. बांधकाम विभाग देगलूर व बांधकाम विभाग बिलोली यांचे याकडे लक्ष नाही हा रस्ता दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दररोज अनेक हजारो वाहने दुचाकी, कार, ऑटो, रिक्षा, शाळेचे बस अश्या अनेक वाहने या रोडवरती धावत असतात. अशातच तेलंगानातून कर्नाटककडे जाणारा हा रस्ता दळणवळणासाठी खूप महत्वाचा व जवळचा मार्ग असून नवीन वाहनचालकांना या रस्त्यावर वाहन चालवत असताना तारेवरची कसरत करावी लागते. नवीन वाहन चालक जर या रस्त्यावर आला तरी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत खड्ड्यामध्ये जर पाणी साचलं आणि चालकाला अंदाज नाही आला तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तीन-तीन फूट खोल हे खड्डा रस्त्याच्या मध्ये व आजूबाजूला त्या ठिकाणी काठीचे झाडे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत काही ठिकाणी वळण असल्यामुळे पुढून येणारे वाहन सुद्धा दिसत नाही, तरीसुद्धा बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेत आहे अशी नागरिकांची तक्रार आहे. बांधकाम विभागाने हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून आजूबाजूची झुडपे हटवण्यात यावी आणि जे तीन तीन फूट खोल खड्डे पडले आहेत ते लवकरात लवकर डांबर भरून दुरुस्त करतील का असा सवाल नागरिक करत आहेत. हिप्परगा थडी – रामपूर थडी – केसराळी – खतगाव – आदमपूर या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर बांधकाम विभागांनी याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करतील का ? सगरोळी परिसरातील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला.


