अविनाश पोहरे
ब्युरो चीफ, अकोला
पातुर- तुळसाबाई कावल विद्यालय येथे दिनांक 3 मे 2024 पासून सुरू झालेल्या इंग्लिश स्पीकिंग समर कॅम्पचा समारोप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.विद्यालयाचे प्राचार्य अंशुमन गहिलोत सर यांच्या अनुमतीने पंकज अवचार, रविकिरण अवचार, कु.वैष्णवी ढोकणे यांच्या मार्गदर्शनाने इंग्लिश स्पीकिंग समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.समर कॅम्प मध्ये वेगवेगळ्या विद्यालयातून वेगवेगळ्या वर्गाचे एकूण 62 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये अनेक प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज घेऊन विद्यार्थ्यांमध्ये इंग्लिश स्पिकिंगची गोडी निर्माण करण्यात आली. दि. 23 जून 2024 ला कॅम्पचा समारोप करण्यात आला.त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंकज अवचार तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.एच एन सिन्हा महाविद्यालय पातुरचे प्राचार्य डॉ.किरण खंडारे, महाविद्यालयाचे प्राध्यापक अरविंद भोंगाळे आणि महादेवराव बंडे विद्यालयाचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले अध्यापक किसन अवचार यांना आमंत्रित करण्यात होते.समर कॅम्पच्या कालावधीत ज्या काही ऍक्टिव्हिटीज घेण्यात आल्या होत्या त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये विद्यार्थ्यांना आकर्षक असे बक्षीसे देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व पालकांनी समर कॅम्प विषयी मनोगत व्यक्त केले.त्यामध्ये पालकांनी व विद्यार्थ्यांनी दरवर्षी असाच कॅम्प आयोजित करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील इंग्रजीची भीती नाहीसी होऊन स्पिकिंग चा कॉन्फिडन्स वाढल्याचा आढळून आले.पुढील शैक्षणिक प्रवासासाठी मार्गदर्शन व शुभेच्छा देण्यात आले,प्रसंगी विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने प्रफुल्लित झाले होते. परंतु हा प्रवास क्षणिक होता.या विचाराने विद्यार्थ्यांना गहिवरून सुद्धा आले होते.तो सर्वांसाठी एक अविस्मरणीय क्षण देखील होता.खरं तर हा प्रवास थांबलेला नसून त्याची सुरुवात झालेली आहे.कॅप मधून कितीतरी मुले इंग्रजी भाषेचे ज्ञान घेऊन बाहेर पडतील अशी आशा करूया.