शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि.21महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात सेलू तालुक्या तील कुपटा येथील शेतकरी एकनाथराव सोळंके यांची नातसुन डॉ. अलका सुमंत सोळंके यांची उप शिक्षणाधिकारी या पदावर निवड झाली आहे.डॉ. सोळंके ह्या बी.ए.एम.एस. असून त्या चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे पती सुमंत सुभाषराव सोळंके (आयएफएस) हे सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे उपसंचालक पदावर कार्यरत आहेत. पतीसोबत राहून डॉ.अलका यांनी मेळघाटात वैद्यकीय सेवा देताना खडतर परिस्थितीमध्ये स्थानिकांना आरोग्य सेवा दिली. यापूर्वी देखील त्यांची 2018 मध्ये पोलीस उप निरीक्षक पदी निवड झाली होती. परंतु मुख्य ध्येय राज्यसेवा असल्याने या पदावर रुजू न होता त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला आणि त्यांनी उप शिक्षणधिकारी पदा पर्यंत झेप घेतली.दरम्यान, दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देत असताना तेथील शिक्षणाची दुरावस्था पाहता शैक्षणिक क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखविण्याची जिद्द मनाला स्वस्थ बसू देत नव्हती. मनात ठरवलं आणि राज्यसेवा स्पर्धा परिक्षेची तयारी केली आणि शेवटी राज्य सेवा परिक्षेतील निकालात उप शिक्षणाधिकारी पदावर निवड झाली असल्याने ज्या शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची आवड़ होती ते मिळाले असल्याची प्रतिक्रिया डॉ. अलका सोळंके यांनी दिली.