शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू:- सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान येथे वारकरी संप्रदायातील महत्वाचा दिवस म्हणजे ‘आषाढी एकादशी’ त्या निमित्त (ता.16) वार मंगळवार रोजी उत्कर्ष विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त वेशभूषा स्पर्धा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयजी रोडगे, प्रशालाचे मुख्याध्या पक कैलास ताठे सर, जिज्ञासा बाल विहार च्या सौ.शिंदे मॅडम व शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. या प्रसंगी विध्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांची वेशभूषा केली होती त्यामध्ये प्रामुख्याने,संत नामदेव,संत एक नाथ,संत तुकाराम,संत मीराबाई,संत मुक्ताबाई यांची वेशभूषा करुन आले होते. विशेष म्हणजे या वेशभूषेचे प्रमुख आकर्षण विठ्ठल- रुख्मिणी ठरले.विठ्ठल रुख्मिणी समोर वेशभूषा करणाऱ्या संतांनी भारूड,गवळणं,भजन देखील केले मुलांना प्रत्यक्षात पंढरपूरला आल्यागत वाटले व वेशभूषेचे पालकांनी देखील मोठ्या मनाने कौतुक केले. या मुलांनी भारूड,अभंग गाऊन सर्वांचे मन भक्तिमय केले अशा प्रकारे वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली कार्यक्रमाच्या यशस्विते साठी उत्कर्ष विद्यालया च्या व जिज्ञासा बाल विहार च्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.