शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चा कारभार गेल्या सहा महिन्या पासून चालू असलेल्या गलथान कारभाराची चौकशी करण्याबाबत आज माननीय जिल्हा उपनिबंधक साहेब कार्यालय परभणी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित संचालक एडवोकेट दत्ता नारायणराव कदम अनिल राव पवार अशोक दादा अंभोरे सुरेंद्र शेठ तोष्णीवाल होते . निवेदनावर मार्केट कमिटी संचालक डॉक्टर संजय दादा रोडगे, दत्ता नारायणराव कदम शैलेश शेठ तोष्णीवाल, अनिल पवार, रामेश्वर राठी, आदी संचालकां च्या सह्या आहेत. संचालक मंडळाने वारंवार सूचना करूनही सचिव यांनी अद्याप पावतो संचालक मंडळाने सांगितलेले कोणतेही ठराव प्रोसिडिंग वरती पूर्ण लिहिले नाहीत. तसेच भरपूर ठरावास संचालकांनी विरोध दर्शवून ही तसे न लिहिता ठरावास बहुमताने मान्यता आहे असे चुकीचे लिहिले. मार्केट कमिटी मध्ये गैरव्यवहार झाल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी करावी. अशी मागणी करण्यात आली.