अतिश वटाणे तालुका प्रतिनीधी उमरखेड
उमरखेड:- तालुक्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या ढाणकी शहरांमध्ये कुठल्याही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हिस्टरी लिस्ट वर असलेले गुन्हेगार तसेच कुख्यात गुन्हेगार यांच्यावर बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेम केदार यांनी चांगलाच कायद्याचा बडगा उचललेला आहे. काल दिनांक 20 नोव्हेंबर रोजी ढाणकी शहरांमधून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ढानकी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावे यासाठी स्वतः ठाणेदार व त्यांचे कर्मचारी यांनी मागील एक आठवड्यापासून रात्रंदिवस आपले कर्तव्य चोखपणे बजावून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेत अट्टल गुन्हेगार यांना समज देऊन कायद्याचा चांगलाच बडगाव उचलल्याचे शहरांमध्ये चर्चा आहे तसेच २ अधिकारी, सेंट्रल पोलिस फोर्स चे ४० कर्मचारी, आर. सी. पी.ची संपूर्ण १ तुकडी सोबत बिटरगाव पोलीस स्टेशन चे ११ पोलीस कर्मचारी, १० होमगार्ड यांनी काल दुपारी तीन वाजता च्या दरम्यान ढाणकी शहरातून सुरुवात करून संपूर्ण गावातून रूट मार्च काढून आगामी लोकसभेची परिपूर्ण तयारी चोखपणे बजावण्याठी सज्ज असल्याचे दृश्य संपूर्ण गावातून दिसून आलेले आहे.