गजानन वानोळे ग्रामीण प्रतिनिधी किनवट
किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंदी तांडा येथे आज दिनांक 21 मार्च हा रोजी जागतिक वनदिनानिमित्त संदीप चव्हाण साहेब विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण नांदेड श्रीकांत जाधव साहेब सहाय्यक वनसंरक्षक, संध्या बगडे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी किनवट यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र किनवट मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंदी तांडा तालुका किनवट येथील शाळेमध्ये 21 मार्च जागतिक वन दिवस निमित्त शालेय विद्यार्थ्यांना वनांचे महत्त्व, पर्यावरणाचे महत्त्व, हवामानात होणारे बदल, शाळेतील विद्यार्थ्यांना बी गोळा करून सीड्स बॉल तयार करण्यास उत्साह दिसून आला व शाळेमध्ये वृक्ष लागवड करून वन दिन साजरा करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास पाटील सर मुख्याध्यापक,तसेच सर्वश्री टी ए देवकते वनपाल, एस पी डोईफोडे वनपाल, बी एस भुरके वनरक्षक. नरवाडे सर ,बाळासाहेब तिडके,बाबू मुंडकर,माधव मुंडकर सर ,मिना नारपेडवार मॅडम, भुसमवाड सर, वेदाचार्य राठोड ,अंकुश राठोड,तसेच गावातील नागरिक अर्जुन जाधव, विनोद राठोड,रमेश जाधव सेवक,गणेश पवार उपस्थित होते.