पाथर्डी : बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचा विदयार्थी विशाल चेमटे याची स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे होणाऱ्या आखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल स्पर्धेसाठी व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव आंतर विद्यापीठ हॉलीबॉल स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली आहे. तर विदयार्थी निखिल आव्हाड याने पुणे येथे झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतर विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेत १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करत रौप्य पदक पटकावले.


