सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी
वैद्यकीय शिक्षण घेतलेले नसताना वैद्यकीय परवाना नसतांना ( सिसा तालुका अक्राणी) येथिल रुग्णांवर उपचार करून रुग्णाचा जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरविरुद्ध धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तालुका आरोग्य अधिकारी व तहसीलदारांकडे याबाबत तक्रार निवेदन दिले होते. सिसा येथे रिदय देवनाथ विश्वास हा संशयित कुठलेही वैद्यकीय पदवीचे प्रमाणपत्र नसताना वैद्यकीय व्यवसाय करत होता म्हणून आरोग्य अधिकारी कांतीलाल पावरा यांच्या फिर्यादीवरून धडगांव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


