जलील शेख तालुका प्रतिनिधी, पाथरी
पाथरी : तालुक्यातील ढालेगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे अपघात होऊन अनेकजन गंभीर जखमी झाले होते.पावसाळ्याचे पाणी साचल्याने खोल खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने मागील पंधरा दिवसात वीस ते पंचवीस मोटार सायकल स्वार या ठिकाणी पडून फ्रॅक्चर झाले होते.अनेक वेळा सांगूनही सामाजिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नव्हते.म्हणून सामाजिक जाणीवतुन स्वतःपुढाकार घेत व स्वखर्चातून नेहमी समाज सेवेत अग्रेसर असलेले प्रा.मलिक पटेल यांनी सदरील खड्डे बुजून मानवतेचे दर्शन घडवले आहे.त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यानंतर तरी सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग याची दखल घेऊन पाथरी बस स्थानकापासून माजलगावच्या बस स्थानकापर्यंतचे राहिलेले खड्डे बुजवून आपल्या कर्तव्याचे पालन करेल का पाहावे लागेल?