अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी
आकोली ते अकोली फाटा हा रस्ता खूप चिखलमय झाला असून या रस्त्यास पांदण रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे . या रस्त्याने नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना चालणे सुद्धा खूप कठीण झाली आहे. बऱ्याच वेळेस शाळेत विद्यार्थी जात असताना शाळेतील गणवेशावर वाहनामुळे चिखल उडत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेचे दोन दोन गणवेश राहत नाहीत . त्यामुळे तसाच चिखलानी माखलेला शाळेचा गणवेश विद्यार्थी घालून जातात तर कधी गणवेश खराब झाला म्हणून परत चार ते पाच किलोमीटरचा प्रवास हा पाई करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बऱ्याच वेळेस उशीर होत आहे. रोज पाच किलोमीटरचा पाई प्रवास यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर सुद्धा फरक पडत आहे. शाळेत वेळेवर न गेल्यामुळे बऱ्याच वेळेस एखादा दोन प्रेड सुद्धा जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याच्या मार्गावर आहे. तर बऱ्याच वेळेस विद्यार्थी व नागरिक सुद्धा पाय घसरून पडत आहे. कधी कधी टू व्हीलर चिखल मय रस्त्यांनी घसरत आहेत व नागरिक पडत सुद्धा आहे. कधीकधी चिखला तून मार्ग काढते वेळी बॅलन्स न आल्यामुळे एखादी खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. तरी सध्या पूर्णतः पावसास सुरुवात झालेली नाही. साधारण पावसाच्या सरी जरी कोसळल्या तरी रस्त्यात खूप चिखल होत आहे.मोठा पाऊस झाल्यास रस्त्यात किती चिखल होईल हे सांगता येणे खूप कठीण आहे. एरवी कोणतीही निवडणूक असो लोकप्रतिनिधी नेते पुढारी सर्वच गावाकडे फिरायची विकास कामाची आश्वासने द्यायची परंतु आता या रस्त्याकडे कोणताच नेता किंवा लोकप्रतिनिधी ढुंकून सुद्धा पाहत नाही . एरवी मोठमोठे आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी गेले तरी कुठे? लोकप्रतिनिधी बॅनर बाजी करण्यासाठीच का? लोकप्रतिनिधींना गावातील नागरिकांची व विद्यार्थ्यांची दूर अवस्था दिसत नसेल का? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. विद्यार्थ्यांची11 ते 5 शाळा , शाळा सुटल्यानंतर लगेच ट्युशन किंवा कम्प्युटर,, ट्युशन , जाण्या येण्यासाठी एक तास लागतो म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास केंव्हा करायचा. सध्या पेरणीचे दिवस चालू असून शेतकऱ्यांना ढाणकी येथे खत, बी ,बियाण्यासाठी यावे लागते. त्यामुळे शेतकरी व नागरिकांची व विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत. या सर्व बाबीकडे लक्ष देऊन प्रशासनाला आता तरी जाग येईल का? व रस्त्याचे काम पूर्णत्वास लागेल का? असा प्रश्न शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांच्या वतीने उपस्थित होत आहे.