शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि.29 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपन्न केले. दांडगे गायत्री 77.40%, वडे तन्वी 72.20% तर कुर्हे कोमल 72.00% गुण मिळवून यांनी अनुक्रमे महाविद्यालयातून प्रथम,द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळविला.त्यांच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, संस्थेच्या सचिव डॉ.सौ.सविताताई रोडगे, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य प्रा. अक्षय बन, शैक्षणिक विभागप्रमुख प्रा. महेश कोल्हे, विभागप्रमुख वैभव शिकरे, परीक्षा व मूल्यमापन विभाग प्रमुख प्रा. महादेव खोसे व तसेच आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .


