अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी नारायण सुरोषे साहेब सेवा निवृत्त झाल्याबद्दल बँकेत छोटेखानी सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवण्यात आला होता.त्यात त्यांनी बँकेतील कर्मचारी, बँकेतील ग्राहक , व त्यांच्या चाहनारा वर्ग यांच्यातर्फे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.ते बँकेमध्ये १९९२ मध्ये रुजू झाले . त्यांच्या पूर्ण सेवेचा कार्य काल ३२वर्षे त्यात ढाणकी त ते दि २७/७/२०१२ पासून ते २०२४ पर्यंत त्यांचा यवतमाळ मध्यवर्ती बँकेत कार्यकाल गेला, म्हणजेच १२ वर्षे त्यांनी ढाणकी येथे मध्यवर्ती बँकेत काढले. आज ते सेवा निवृत्त झाले त्यामुळे बँकेत छोटेखानी कार्यक्रम ठेवण्यात आला होता .अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यात त्यांनी साहेबांशी त्यांच्यासोबत गेलेली बारा वर्षाच्या कार्यकाळातील अनेक किस्से गिरवले. साहेब कसे राहायचे सर्वांसोबत बंधू भावाप्रमाणे कसे वागायचे. आडल्या नडलेल्यांना ते वेळोवेळी कसे मदत करायचे त्यांची अतिशय साधी राहनी त्यात ते उमरखेड राहायचे त्यांना टू व्हीलर चालवाय बनत नसे. १७ते१८ की.मी . प्रवास ऑटो ने करायचे. सर्वांना ते मामा या नावाने सुप्रसिद्ध होते. त्यांचा चेहरा नेहमी हसत राहायचा अगदी शांत स्वभाव सर्वांशी प्रेमाने वागायचे. ते आज जरी निवृत्त झाले असतील तरी ते आमच्या कायम आठवणीत राहतील वेळोवेळी आम्हाला त्यांचे मार्गदर्शन लागेल अशा अपेक्षा बँकेतील कर्मचाऱ्यांनी व बँकेतील ग्राहकानी केल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बंटी वाळके ग्राम विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णापुरचे माजी सरपंच के.डी हुलकाने , पंजाब तवर माजी कर्मचारी चातारी , अशोक कुंभार माजी अध्यक्ष ढाणकी, विशाल सुरोशे, पत्रकार दिगांबर शिरडकर , सीमा गायकवाड समाजसेविका , इबा दुल्हा खा पठाण ग्राम विविध सहकारी सोसायटी उपाध्यक्ष हे होते. सूत्रसंचालन ए. एम. नाईक शाखा व्यवस्थापक ,यांनी केले , प्रास्ताविक एस .ए .पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाबा वाढवे यांनी केले.











