शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू: महाराष्ट्र शासन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभाग, परभणी तसेच मा.श्री कै. ममता रामजी काटकर जनहित प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सेलू येथे आज दिनांक 15 जुलै 2024 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी मराठवाड्यातील नामांकित कंपन्या बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम केले. सदरील मेळाव्यास 23 कंपनी मध्ये 1617 रिक्त पदे होते. या मेळाव्यास सेलू, जिंतूर, मानवत येथील आयटीआय, पदवीधर दहावी , बारावी शिक्षण घेतलेल्या युवक युवतींचा समावेश होता. रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संजय रोडगे प्रमुख उपस्थिती भाजपचे अर्जुन बोरुळ , भाजपा तालुका अध्यक्ष दत्तराव कदम, भाजप शहराध्यक्ष अशोक अंभोरे , तसेच आयटीआय ची प्रतिनिधी प्राचार्य उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग परभणी सहाय्यक आयुक्त प्रशांत खंदारे व मा.के. ममतारामजी काटकर जनहित प्रस्थानचे अध्यक्ष बाबा काटकर, गजानन गात यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे आभार बाबा काटकर तसेच बजरंग अरकुले यांनी सूत्रसंचालन केले.