रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला : खासदार अनुप धोत्रे यांनी आपल्या सक्रियतेचा परिचय देऊन अकोला येथुन प्रथमच पंढरपूर रेल्वे विशेष गाडी सुरू केली आहे हि गाडी दि 16 जुलै रोजी सकाळी दहा वाजता प्लॅट फॉर्म नंबर सहा वरून ही गाडी सुटणार असून ति 18 तारखेला परत पढंरपुरवरुन अकोल्याला येणार आहे. पंढरपूर साठी विशेष गाडी अमरावती नागपूर आणि खामगाव इथूनच जात होत्या परंतु खासदार झाल्यानंतर प्रथमच अनुप धोत्रे यांनी वारकऱ्यांच्या आणि सांस्कृ तिक संवर्धन आणि महाराष्ट्रा चे आराध्य दैवत विठ्ठल रुक्माई यांच्या दर्शनासाठी कमी दरात नागरिकांना दर्शन घडावे यासाठी रेल्वे मंत्रालया कडे मागणी केली दक्षिण मध्य रेल्वेने विशेष ट्रेन आज रात्री नांदेड वरून अकोल्यात येणार आहे आणि सकाळी दहा वाजता खासदार धोत्रे यांच्या शुभहस्ते या मतदार संघातील वारकर्याचे व भाविकांच्या सेवेसाठी अकोला येथे रेल्वे स्टेशन वर प्लॅटफॉर्म नंबर सहावर येते. अशी आमदार भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षते खाली ,आमदार प्रकाश भारसाकळे ,आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील, जयंत मसने,विजय अग्रवाल, कृष्णा शर्मा व या भागातील नगरसेवक लोकप्रतिनिधी रेल्वे सल्लागार समिती सदस्य वसंत बाचूका, उमेश मालू, एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर, यांच्या उपस्थितीत तसेच विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व वारकऱ्यांनी कमी दरात रेल्वे प्रवास करण्या साठी या संधीचा अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती खासदार अनुप धोत्रे यांनी केली आहे.


