स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे उमरखेड च्या अवतीभवती असलेल्या ग्रामीण भागातील शेतकरी बंधू पावसाळ्याचे दिवस असल्याने. शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी उमरखेड या गावात येजा करत असतात. त्यासाठी ते चार चाकी वाहनाचा वापर करावा लागतो. उमरखेड पुसद व महागाव या परिसरात खेड्यातून चार चाकी वाहनातून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आरटीओ ची चांगली डोकेदुखी वाढली. वाहने थांबून दोन तास कागदपत्र तपासणीच्या नावाखाली पैसा गोळा करण्याचा गोरख धंदा चालवला आहे. रोज होत असलेल्या गाडी तपासणीच्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी ही व्यथा आमदार साहेबांच्या कानावर टाकले. कर्तव्यदक्ष असलेले आमदार नामदेव ससाने साहेब यांनी तातडीने दखल घेत. स्वतः रस्त्यावर उतरून आरटीओ ची चांगलीच कान उघडणे केली. कोणताही वाहनास थांबू नका, नाहक त्रास देऊ नका असे त्यांनी ठणकावून बजावले.