रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
वाडी अदमपूर जाफ्रापूर येथे नुकतेच भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त मोठ्या उंच पुलाचा व विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमि पूजन सोहळा मोठ्या थाटात पंचक्रोशीतील सर्व जनतेच्या उपस्थितीत संपन्न झाला.कार्यक्रमाचे आयोजन कर्तव्य दक्ष सरपंच रुपेश राठी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी केले होते.या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याला गावातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य व उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून विकास महर्षी आमदार श्री प्रकाश पाटील भारसाकळे हे होते.गजानन उंबरकार ,गजानन नळकांडे , रमेश दुतोंडे, उमेश पवार, किरण पाटील अवताडे, जनार्दन नागोलकर, समाधान गावंडे, शिवहरी भारसाकळे, रामकृष्ण नागोलकर,गजानन साबळे, गजानन गायकवाड , विजय देशमुख,ओमसुईवाल, रवी गाडोदिया,गणेश इंगोले ,आदी लोकांची उपस्थिती लाभली.वाडी अदमपूरचे लोकप्रिय सरपंच रुपेश राठी यांनी आमदार साहेबांकडे सतत पाठपुरावा करत आपल्या गावासाठी अनेक विकासाची कामे कजेचून आणलीत. जनसेवे चा ध्यास घेतलेल्या सरपंच व त्यांच्या इतर ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या कार्य काळात गावाचा चेहरामोहरा बदलवून टाकला.आमदार भारसाकळे यांनी गावच्या विकासासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने त्यांची रथावर मिरवणूक काढण्यात आली व त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमा चे सूत्रसंचालन अमोलव्यवहारे यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता समस्त गावकरी मंडळी सरपंच रुपेश राठी यांना ग्रामपंचायत पदाधिकारी उपसरपंच विठ्ठल खारोडे जितेंद्र जाधव ,मंगेश वाघ ,नितीन साबळे, रणजीत बोदडे, प्रमोद बोदडे यांनी मोलाचे योगदान दिले. व माननीय प्रकाश पाटील भारसाकळे यांनी ईसापुर येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेला भेट देऊन भगवान श्री जगन्नाथ रथाचे पूजन करून रथयात्रेमध्ये सहभागी झाले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कर्तव्यदक्ष सरपंच रूपेश राठी यांनी केले.