शिवाजी शिंदे तालूका प्रतिनिधी, सेलू
सेलू : दि. 10 जिल्ह्या तील सुशिक्षित बेरोज गार उमेदवारां साठी जिल्हा कौशल्य विका स दिनाच्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व कै. ममतारामजी काटकर जनहित प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 15 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता “पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा साई मंदिर, महेश नगर, सेलू येथे आयोजित केला आहे.परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जिल्ह्यातील गरजू सुशिक्षित बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची एक संधी उपलब्ध व्हावी या हेतूने महारोजगार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास राज्या तील विविध नामांकित मोठे उद्योजक कंपन्या सहभाग नोंदविणार आहेत. वस्तीगृह अधिक्षक, रिलेशनशिप मॅनेजर, बीजनेस डेव्हलपमेंट मैनेजर, सेल्स रिप्रेजेंटेटिव्ह, एच.आर.,फिल्ड ऑफिसर, विमा सल्लागार, ऑपरेटर, ट्रेनी, प्रोडक्शन वर्कर, इलेक्ट्रीशीयन इत्यादी पदांसाठी मुलाखती घेवून जागेवरच निवड करण्यात येणार आहे. महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित उमेदवारांनी(mahaswayam.gov.in) या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी. ही सुविधा मेळाव्याच्या ठिकाणीही करण्यात आली आहे. महा रोजगार मेळाव्यात प्रत्यक्ष नावनोंदणी करण्यासाठी सकाळी 09:30 वाजता शैक्षणिक किंवा अनुभव प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांसह उपस्थित राहावे.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योलजकता, परभणी यांनी केले आहे.


