स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये दरमहा महिना या योजनेसाठी बँकेचे खाते क्रमांक आवश्यक होते. पुसद अर्बन बँकेने आपल्या सर्व शाखांमध्ये शून्य बॅलन्स वर मोफत खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 21 ते 65 वर्ष वयोगटातील शासन निकषात बसणाऱ्या महिलांना मानसिक दीड हजाराचे अनुदान बँक खात्यात जमा करण्याची योजना नुकतीच जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र असलेल्या पुसद अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या सर्व 37 शाखा मध्ये वरील योजनेच्या लाभार्थी महिलांना शून्य बॅलन्स वर मोफत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड व दोन पासपोर्ट फोटो या कागदपत्राशिवाय कोणताही खर्च लागणार नाही. या संधीचा योजनेस पात्र सर्व भगिनींनी लाभ घ्यावा असे आव्हान पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैद व संचालक मंडळाने केले आहे.


