रितेश टीलावत
जिल्हा प्रतिनिधी अकोला
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या अभियाना अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे 51 लाखाचे पारितोषिक प्राप्त प्रभात किड्स स्कूलचे संस्थापक संचालक आणि विदर्भ साहित्य संघ, अकोला शाखेचे पदसिध्द सदस्य डॉ. गजानन नारे व वंदना नारे यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.डॉ. गजानन नारे व वंदना नारे यांच्या गुणवत्ता पूर्ण व कुशल शैक्षणिक व्यवस्थाप नाने अकोल्या तील ‘प्रभात’ शाळेला राज्यस्तरा वर प्रथम क्रमांक प्राप्त होतो याचा विदर्भ साहित्य संघाला आनंद तर आहेच. शिवाय त्याचे संस्थापक संचालक आपल्या विदर्भ साहित्य संघाचे पदसिध्द सदस्य असल्याने अभिमानही आहे. त्यामुळे उभयतांचा गौरव करताना आनंद होतो” असे विचार या प्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष विजय कौसल यांनी व्यक्त केले. यावेळी सत्कारा ला उत्तर देताना ‘गुणवत्तापूर्ण शैक्षणिक ध्यासाची स्वप्नपूर्ती झाली असे मनोगत डॉ. गजानन नारे यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक वि.सा.संघाचे सचिव डॉ. विनय दांदळे यांनी तर सन्मानपत्राचे वाचन विदर्भ साहित्य संघाचे सहसचिव प्रा.डॉ. सुहास उगले यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलेश पाकदुने तर आभार प्रदर्शन विदर्भ साहित्य संघाचे कोषाध्यक्ष नीरज आवंडेकर यांनी केले.कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाचे अध्यक्ष विजय कौसल, कार्याध्यक्ष सीमा शेटे-रोठे, उपाध्यक्ष सुरेश पाचकवडे, सहसचिव मोहिनी मोडक, कार्यकारिणी सदस्य अशोक ढेरे, विजय देशमुख, प्रा. डॉ. गजानन मालोकार, कल्पना कोलारकर, बाजी वझे हे प्रामुख्याने उपस्थित होते.


