कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी विधानसभा २०२४च्या निवडणुका लागलेल्या असून पुसद विधानसभेतील शिवसेनेचे आम्ही सर्व पदाधिकारी आपणास अशी विनंती करतो की पुसद विधानसभा ही शिवसेना पक्षाकडेच ठेवावी कारण धनुष्यबाण ह्या चिन्हावर येथून पारंपारिक शिवसेनेलाच मतदान झालेले आहे यापूर्वी स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांनी विरोधकाशी अर्थपूर्ण हात मिळवणी करून एन वेळेवर नवखे उमेदवार देण्यात आले होते २०१९ च्या लोकसभेत शिवसेनेच्या भावना गवळी यांना पुसद विधानसभेतून ५७८५मतांची आघाडी होती त्यानंतर २०२४ च्या लोकसभेत प्रचंड विरोधी वातावरणात ही पुसद विधानसभेतून धनुष्यबाणाला ५००० मतांची आघाडी मिळाली होती करिता आपणास विनंती आहे की २०२४ ची पुसद विधानसभा शिवसेना पक्षाकडे ठेवण्यात यावी २०२४च्या निवडणुकीत धनुष्यबाणच पुसद विधानसभेतून निवडून येऊ शकतो कृपया याकडे लक्ष देण्यात यावे असे विनंती या पत्राद्वारे करण्यात आली यावर उमाकांत पापीनवार जिल्हाप्रमुख राजन मुखरे शिवसेना स्थानिक नेते दीपक काळे उपजिल्हाप्रमुख संजय बयास तालुकाप्रमुख सोपीनाथ माने तालुका संघटक दीपक उखळकर शहरप्रमुख अनिल चव्हाण शहर संघटक लखन राठोड युवा सेना पुसद विधानसभा अधिकारी अनिल तोंडारे उपशहर प्रमुख नरेंद्र राठोड उप तालुकाप्रमुख यांच्या सह्या आहेत