किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे डॉ. सी व्ही रमण यांचा जन्मदिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून आज मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.डॉ. सी व्ही रमण नोबल पारितोषिक विजेते यांचा जन्मदिवस हा देशभर राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केल्या जातो. त्यानिमित्त तुळसाबाई कावल विद्यालय येथे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी अतिशय चिकित्सक आणि मार्मिक अशी विज्ञानाची उपकरणे तयार करून विज्ञान प्रदर्शनी मध्ये मांडली.
त्यानंतर कार्यक्रमांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन आणि विज्ञान यांची सांगड घालत विविध नाटिका आणि भाषणे विद्यार्थ्यांना मार्फत देण्यात आली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विज्ञान शिक्षक एस एस ठाकूर आणि एस एस डोंगरे यांचे लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ रश्मी ठेंगे यांनी म्हटले. विज्ञान आणि आपल्या घरातील आई-वडिलांची संस्कार या सर्वांची जपवणूक करत आपण हा विज्ञान दिवस साजरा करत आहोत. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मोठ्या हिरीरीने कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला उपस्थित अंशुमानसिंह गहिलोत, कीर्ती गहिलोत, एस यु देशमुख, पी एम कारस्कर, एस जी सुरवाडे, एम बी परमाळे ,एस आर मुखाडे ,सी आर साळुंखे होते. सूत्रसंचालन विद्यार्थी आचल पातुरे, कृतिका गाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन सोनम राठोड यांनी मानले.