महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने चंद्रपूर जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने स्थानिक तालुका क्रीडा संकुल भद्रावती च्या मैदानावर दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ ला सब जूनियर १४ वर्षाखालील (मुले व मुली) राज्यस्तरीय अजिंक्यपद रग्बी स्पर्धा-२१-२२ चे उद्घाटन आ. प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वेकोलि कुचना क्षेत्राचे महाप्रबंधक गुप्ता, नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर तसेच नगरपरिषदेच्या नगरसेविका सरिता सूर, प्रतिभा सोनटक्के, अनिता मुडे, जयश्री दातारकर, शितल गेडाम, लक्ष्मी पारखी, शोभा पारखी, प्रतिभा निमकर उपस्थित होते. या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यातील मुलांच्या व मुलींच्या ४२ संघांनी भाग घेतला आहे.










