विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सर्व आजूबाजूच्या गावांमध्ये पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाढवे यांनी अवैद्य धंदे करणाऱ्यावर कडक कारवाया करत आहेत. त्यामुळे अवैद्य धंद्यावाल्या चे धाबे दणाणले आहेत. पेट्रोलिंग करीत असताना धाकली या गावामध्ये नदीपात्रात हातभट्टीच्या दारूचा व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली असता. पो.कॉ. राजू वानखडे, अभिजीत शिरसाट, बीड जमादार हीरवळकर, ज्ञानेश्वर राठोड, शेखर गोरे, यांनी हातभट्टीचा संपूर्ण मा ल अंदाजे किंमत ६५०००, जप्त केला आहे. ही कारवाई पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाढवे, माहुरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाढवे स्वतः गावामध्ये पेट्रोलिंग करत असताना गावातील पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, सरपंच, यांना गावामध्ये अवैद्य धंद्यावाल्या ना समजावून सांगण्याचे काम करावे जेणेकरून आपले गाव व्यसन मुक्त होईल असे समजावून सांगण्याचे काम पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजय कुमार वाढवे हे करीत आहेत.