मनोज कामडी
तालूका प्रतिनिधी जव्हार
जव्हार : जिल्हा परिषद केंद्रशाळा हिरडपाडा येथे आज रानभाज्या महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमासाठी शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत च्या सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मुलांनी व त्याच्या पालकांनी या परिसरातील जंगलातुन मिळणाऱ्या रानभाज्या गोळा केल्या असून त्यामध्ये माठ,तेरे, बाफळी पाला, फटागंरीचा पाला, पेंढरे,लोती, कोंब,शेवग्याच्या पाला व शेंगा, चाईचे वेल आकोडा वेल, आखरीचा पाला, कोथळी ची भाजी,कुरूडू, कांदाच्या वळी, काकडी,अंबाडी अडसुळा, तूळस या सारख्या जवळपास १८ प्रकारच्या वेगवेगळ्या रानभाज्या गोळा करून त्याचे विद्यार्थ्यांचे गट पाडून प्रदर्शन मांडून विद्यार्थ्यांनी याविषयी रानभाज्या चे आहारातील महत्व व त्याचे औषधी गुणधर्म याविषयी माहिती सांगितली, तसेच शाळेचे शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना जंगली रानभाज्या चे महत्व पटवून दिले व याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरडपाडा केंद्राचे केंद्रप्रमुख केंद्रप्रमुख- जयराम घेगड आवर्जून उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले.व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहन दिले. सदर उपक्रम शाळेने राबविण्यालयाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक गवरचंद शिवदे,सहशिक्षक- मच्छिंद्रनाथ देवढे,भरत गावित ,विशाल महाले, प्रविण जाधव,सुहास कुस्मावार,यांचे कौतुक केलं.सदर रानभाज्या प्रदर्शन शाळेत राबविल्याबद्दल शाळेचे सर्वच स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.