करामत शाह
ग्रामीण प्रतिनिधी, आगर
राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्यात येतो,सदरची या योजना राबवून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यात येतात परंतु काही महामंडळांमधून लाभार्थ्यांना दिशाभूल करीत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळ पुणे अंतर्गत राजे यशवंतराव होळकर महाशेष योजना राबविण्यात आली, या योजनेकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले.अकोला जिल्ह्यातील अकोला व बाळापुर तालुका यातील लाभार्थ्यांचे अर्ज या योजनेमध्ये समाविष्ट करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने काही लाभार्थ्यांनी भरले,सदर योजने मधून लाभार्थ्यांना वीस शेळ्या व एक बोकुड हे 75 टक्के अनुदानात मिळणार होते,परंतु सदर योजनेचा लक्षांक अकोल्याला जिल्ह्याला न मिळाल्याने या ठिकाणी अर्ज करून पात्र ठरलेल्या अकोला तालुक्यातील आगर येथील रहिवाशी विशाल मारोती दिवनाले यांची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सदर योजनेमध्ये जिल्ह्याला लक्षांक नसताना ऑनलाईन अर्ज महामंडळाने मागितले तरी कशाला असा प्रश्न सदर पात्र ठरलेल्या लाभार्थ्यासमोर येऊन ठेपला आहे. याची जिल्हाअधिकारी यांनी चौकशी करून सत्य हे जनते समोर आणावे अशी मागणी समाजातील व्यक्ती कडून मागणी होत आहे.