सतिश गवई
तालुका प्रतिनिधी उरण
उरण : उरण तालुक्यातील पिरकोन गाव एका निर्घृण हत्येचा घटनेने हादरलंय.पिरकोन – सारडे रस्त्यावर MDS हाॅटेल परिसरात मुख्य रस्त्यालगत सोमवारी दिनांक १० जुलै रोजी सकाळी साडेसहा सुमारास एका अज्ञात महिलेचा मृत्यूदेह रस्त्यावर बेवारस अवस्थेत आढळला.गळा चिरल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झालं आहे. हि महिला विवाहित असून तिचे वय अंदाजे २८ ते ३५ असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून पिरकोन गावातील नागरिकांनी घटनेची माहिती उरण पोलीस स्टेशनला दिली.यावेळी घटनास्थळावर नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचे चित्र दिसत होते. भल्या पहाटे घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उरण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून उरण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम साहेब व तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणाशोध घेत आहे. महिलेच्या मृतदेहाचा पंचनामा सुरू असून महिलेची ओळख पटलेली नाही.मृतदेहा जवळ ओळख पटण्यासारखे काहीही पोलीसांना मिळाले नसून या प्रकरणाचे गूढ सोडविण्याचे मोठे आव्हान उरण पोलिसां समोर उभे राहिले आहे. दरम्यान दिवसा उजेडी एका महिलेचा गळा चिरलेला अवस्थेतील मृतदेह आढळल्याने पिरकोन गावातील प्रंचड भितीचे वातावरण पसरले आहे.


