शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे विजय शहादेव कसुरकार वय 44 वर्ष राहणार ग्राम बोर्डी यांनी पो.स्टे.ग्रामीण येथे जबानी रिपोर्ट दिला की त्यांची ग्राम बोर्डी आठवडी बाजार येथून शुक्रवारला आठवडी बाजारा जवळ उभी असलेली बजाज बाॅक्सर क्रं. एम. एच. 30- के. 5870 किं.अं.20000/- रु.ची गाडी ही कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेली आहे.अशा फि चे जबानी रिपोर्ट वरून पो.स्टे. ग्रामीणला.अप.नं.264/23 कलम 379 भादविचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला सदर गुन्ह्याचा तपास मा.उपविभागीय पोलीस अधिकारी रितु खोखर मॅडम व मा.सुरज गुंजाळ सहायक परि.पोलीस अधीक्षक प्रभारी ठाणेदार पो.स्टे.अकोट ग्रामीण तसेच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू याचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार उमेशचंद्र सोळंके,पोउपनि विजय पंचबुधे,सपोउपनि दादाराव निखार,पोहेका विलास मिसाळ,पोहेका हरिष सोनोने,नापोका योगेश जऊळकर,पोका उमेश दुतोंडे,पोका सागर नागे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा तपासातून कसून शोध घेतला व आरोपी यांनी चोरून नेले्ली मोटर सायकल बजाज बाॅक्सर कंपनीची क्रं.एम.एच.30- के. 5870 किंअं 20,000/- रु.व या व्यतिरिक्त आणखी चोरलेल्या आठ मोटरसायकल व एक टीव्हीएस व्हिक्टर मो.सा.चे इंजिन असा एकुण नऊ मोटरसायकल व एक इंजिन असा एकुण 3,04000/- रु.चा माल आरोपी नामे(1) रुपराव रामदास लासुरकर वय 44 वर्ष (2) गोपाल सुरेश अढाऊ वय 24वर्ष (3) गोपाल मनोहर सदाफळे वय 32 वर्ष तिन्ही राहणार ग्राम बेलखेड ता. तेल्हारा जिल्हा अकोला यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचा तपास 12 तासाच्या आत उघडकीस आणलेला आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)