संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
दौंड : देलवडी ता.दौंड येथील ग्रामपंचायतीला जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून ५कोटी ९१ लाख रुपये मंजूर झाले आहे त्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाला लागणारे शुद्ध व स्वच्छ पाणी घरोघर मिळणार आहे असे भीमा पाटस स. साखर कारखान्याचे च संचालक विकास शेलार यांनी सांगितले.यावेळी सरपंच नीलमताई काटे यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.
देलवडी ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेसाठी जल जीवन मिशन अंतर्गत निधी मिळाल्यामुळे शुद्ध पिण्याचा पाण्याचा सोय उपलब्ध होणार असून महत्वपूर्ण गरज पूर्णत्वास येणार आहे. आमदार राहुल कुल यांचे विशेष प्रयत्नातून ही योजना मार्गी लागली असून त्याच बरोबर अंतर्गत रस्ते व इतर विकास कामे भरपूर प्रमाणात झाली आहेत व चालू कामांसाठी आमदार राहुल कुल यांच्याकडून भरघोस निधी मिळत आहे असे सरपंच नीलमताई काटे यांनी सांगितले. यावेळी विकास शेलार संचालक भीमा पाटस कारखाना,सरपंच नीलमताई काटे,दत्तात्रय शेलार,बापू शेलार, आर्जून शेलार, नरेंद्र काटे,राजेंद्र शेलार,अनिल शेलार,अविदा अडागळे,गणेश लव्हटे, संजय पडळकर,यशवंत वाघोले,लक्ष्मण शेलार,विकास टकले, बाळासो जाधव,दत्तात्रय आ.शेलार,इत्यादी सह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.


