मनोज कामडी
तालूका प्रतिनिधी जव्हार
जव्हार :- तालुक्यातील प्रभा हिरा गांधी विद्यालय मेढा या ठिकाणी अनुसूचित जमाती चे विद्यार्थी शिक्षण घेत असून नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवायची आवश्यकता होती. या वह्या शाळेतील मुलांना मिळाव्या यासाठी येथील कर्तव्यदक्ष शिक्षिका सुगंधा गावित यांनी पत्रकार चित्रांगण घोलप यांच्याशी संपर्क साधुन वह्यांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आज दि ११ जुलै २०२३ रोजी कै.स्वातंत्र्य सैनिक सदाशिव दामोदर घोलप व कै.मिनाताई विजय घोलप यांच्या स्मरणार्थ ७५ विद्यार्थ्यांना चित्रांगण घोलप यांच्या तर्फे मेढा येथील प्रभा हिरा गांधी विद्यालयात जाऊन वह्या वाटप करण्यात आल्या या वेळी शिवसेना उप शहर प्रमुख साईनाथ नवले ,समाजसेवक शब्बीर खान ,प्रल्हाद कांगणे व विद्यालयाचे मुख्याध्यापक सहदेव मातेरा सर,शिक्षिका सुगंधा गावीत व इतर शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी पत्रकार चित्रांगण घोलप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, खुप शिका मोठे व्हा . छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरीत्र ही अभ्यासा हे चरीत्र तुम्हांला जिवनात प्रेरणा देत राहील. १० वी पास झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ज्या काही अडचणी येतील त्या मी सोडविण्याचा प्रयत्न करीन असेही सांगितले.