कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : तालुक्यातील सीएससी केंद्र चालक पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्याकडून अतिरिक्त पैसे घेऊन आर्थिक लूट करत असल्याचा आरोप तांडा सुधार समितीने मा महादेव जोरवर तहसीलदार पुसद यांना दिलेल्या निवेदनात केला आहे
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी सेतू केंद्र चालकांना प्रति अर्ज चाळीस रुपये प्रमाणे शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे.तसेच सेतू केंद्रावर तसेच सूचना फलक लावणे बंधनकारक असताना सुद्धा तालुक्यातील सेतू केंद्र चालकांनी फलक लावले नाही. पिक विमा भरताना शेतकऱ्याकडून अतिरिक्त 100 ते 150रुपये घेऊन शेतकऱ्याची आर्थिक लूट करत आहे याबाबत सर्व सेतू केंद्रावर धाड टाकून चौकशी करावी सेतू केंद्र चालकाचा परवाना रद्द करण्यात यावा. अन्यथा जनआंदोलन करावे लागेल असा इशारा संजय मदन आडे तांडा सुधार समिती जिल्हा कार्याध्यक्ष तसेच विकास राठोड आशिष राठोड यांनी निवेदनातून दिला आहे.


