भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव:आज दि.11रोजी अहमदनगर या ठिकाणी कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प अहमदनगर पाटबंधारे जलसंपदा विभाग येथे नव्याने नियुक्ती झालेले जगदीश पाटील साहेब यांचे जनशक्ती विकास आघाडी शेवगाव पाथर्डी च्या वतीने आज जि प सदस्या सौ हर्षदाताई काकडे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला तसेच शेवगाव तालुक्यातील वरुर आखेगावसह नऊ गावाच्या पाणी योजनेच्या पुढील कार्यवाही संदर्भात चर्चा करून लवकरात लवकर मार्गी लावावा अशी पाटील साहेब यांना मागणी केली,यावेळी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील तसेच जनशक्ती युवा विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष माणिक गर्जे,जगन्नाथ बोडखे, तुकाराम विघ्ने इत्यादी उपस्थित होते.


