डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी, परभणी
परभणी,दि.08(प्रतिनिधी) :राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा 12 ऑगस्ट रोजीचा नियोजित परभणी जिल्हा दौरा तूर्ततः स्थगित झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी गावडे यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार हे 12 ऑगस्ट रोजी परभणीत दाखल होणार होते. या तिघांच्या दौर्यात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभासह हितगुजाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या दृष्टीकोनातून जिल्हा महसूल यंत्रणेसह अन्य शासकीय व निम शासकीय यंत्रणांनी सर्वतोपरी भक्कम अशी तयारी सुरु केली होती. बहुतांशी तयारी पूर्ण झाली, असे नमूद करीत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा व अन्य मंत्र्यांचा दौरा तूर्त स्थगित करण्यात आला आहे. 15 ऑगस्ट नंतर या दौर्या च्या अनुषंगाने नवीन तारीख कळणार आहे, असेही जिल्हाधिकारी गावडे यांनी म्हटले.