राजेंद्र पोटफोडे
ग्रामीण प्रतिनिधी,अमरापूर
अमरापूर: त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल शेवगांव येथील सैनिकी वसतिगृहयुक्त बालसैनिक व बालसैनिका व स्टाफ यांचे भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा ॲड सौ सुमतीताई साहेबरावजी घाडगेपाटील मॅडम होत्या.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ श्रुतीदिदी आमलेपाटील मॅडम तसेच डॉ अभय देशपांडे संकुलाचे मुख्य प्रशासक बाळासाहेब कोकरे प्राचार्य श्रीमंत काळे प्राचार्या श्रीम सरिता जगताप विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक शिक्षिका सेवक वृंद बालसैनिक बालसैनिका उपस्थित होते.याप्रसंगी डॉ श्रुतीदिदी आमलेपाटील मॅडम यांनी उपस्थित सर्वांना आरोग्याचा कानमंत्र काळजी व उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले.तसेच संस्थेच्या अध्यक्षा ॲड सौ सुमतीताई साहेबरावजी घाडगेपाटील मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणात बालसैनिकांचा सर्वांगीण विकासासाठी त्रिमुर्ती सैनिकी पॅटर्न प्रभावी आहे.सर्वांना तंदुरुस्ती व आरोग्य निरामय राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ज्ञानेश्वर खरड यांनी केले तर उपस्थितांचे मुख्य प्रशासक बाळासाहेब कोकरे यांनी आभार मानले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

