मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी, भंडारा
भंडारा : शहरातील शिवाजी वार्ड नगर परिषदेच्या सार्वजनिक नालीवर अवैधरित्या टिनाचे दुकान, लोखंडी काउंटर लावून अतिक्रमण केले होते. अवैध रित्या दारू व अंड्याचे दुकान लावून सार्वजनिक जागा हडपण्याच्या प्रकाराविरोधात स्थानिक जेष्ठ नागरिक नरेंद्र रामटेके व महिला तर्फे १ आगस्ट २०२३ पासून आमरण उपोषणाला सुरवात करण्यात आली होती. शिवाजी वार्ड मधील अतिक्रमण हटवून ही जागा अंगणवाडी ३ करीता मागणीचा प्रस्ताव नरेंद्र रामटेके यांनी उपोषणाद्वारे केला होता. अखेर उपोषणाच्या आठव्या दिवशी विनोद जाधव (मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद यांचे आदेशाने अतिक्रमण हटवून उपोषण कर्ता नरेंद्र रामटेके यांचे आठव्या दिवशी उपोषण सोडविण्यात आले. यावेळी सुरज निंबार्ते (युवा प्रमुख स्वा. शे. संघटना, अजय मेश्राम सामाजिक कार्यकर्ते, सचिन मेश्राम पत्रकार, सुरेश कोटगले वरिष्ठ पत्रकार, मुकेश मेश्राम पत्रकार, जाहिद शेख, सुरेंद्र चिंधरवडे, रोशन मदनकर पत्रकार, चारुल रामटेके, साहेबराव साखरकर ,व मिथुन मेश्राम नगर परिषद कर्मचारी, व मान्यवर उपस्थित होते.
“जेष्ठ नागरिक नरेन्द्र रामटेके हे सात दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. त्यांची मागणी लक्षात घेता सार्वजनिक ठिकानावरील अवैद्य दारू विक्री व अंडीची दुकान हे बंद झाली पाहिजेत. मी सतत प्रयत्न करतो की, असल्या प्रकारचे ऍक्टिव्हिटी होणार नाही. जो ठेला लावला होता तो नगरपरिषदेकडून काढण्यात आला आहे. यांच्यासमोर पण त्यांच्या मागणीसाठी आम्ही पाठीशी आहोत.”
- विनोद जाधव (मुख्य कार्यकारी अधिकारी न. प. भंडारा)