मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : तायवान येथे सुरू असलेल्या एशियन गेम स्पर्धेत भंडारा जिल्ह्यातील मयुरी लुटे आणि सुशीकला आगाशे या दोन खेळाडंनी भारतासाठी ‘टक सायकलिंग’ या क्रीडा प्रकारात मोलाची कामगिरी करीत २ सुवर्ण, ३ रजत आणि १९ कांस्य पदक अशा सहा पदकांची कमाई केली आहे. मयुरी लुटे आणि सुशीकला आगाशे या दोघीही ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुली असून त्यांचे वडील शेतकरी आहेत.दोघींनीही मिळालेल्या संधीचे खऱ्या अर्थाने सोने केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांची क्रिडा क्षेत्रात सुसाट वाटचाल सुरू आहे. केवळ आपल्या मेहनत आणि कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी यशाचे शिखर गाठले असून राष्टीय व आंतरराष्टीय पातळीवर ओळख निर्माण केली आहे. दोघीही सध्या दिल्ली येथील अकेडमीत प्रशिक्षण घेत आहेत. मयुरी लुटे हिला नुकताच शिवछत्रपती क्रोडा पुरस्कार घोषित करण्यात आला.