मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : जिल्ह्यात भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दि.३० ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत जनजाग॒ती केली जाणार असल्याची माहिती नागपूरचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक सचिन कदम यांनी दि.२० ऑक्टोंबर रोजी विश्राम गृह भंडारा येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधिक्षक सचिन कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधून भ्रष्टाचारावर आढा घालण्याच्या दृष्टीने लाचलुचपत प्रतिबंधक विमाग भंडारा या कार्यालयाकडून करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. शासकीय कार्यलियात काम करण्याकरीता पैश्याची किंवा लाचेची मागणी करीत असल्यास किंवा काम अडवून ठेवत असल्यास याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्याचे आवाहान केले. तसेच भ्रष्टाचारावर आळा घालण्याच्या दृष्टीने दि.३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत जनजागृती केली जाणार आहे. कला पथक, फलक यांच्या माध्यमातून शाळा, कॉलेज, तसेच सार्वजनिक ठिकाणी जनजागृती केली जाणार आहे. लाचलुचपत विभागाकडे तक्रार आल्यास संबंधित तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्यात येईल,असे आश्वासन यावेळी सचिन कदम यांनी पत्रपरिषदेत दिली. पत्रपरिषदेत ‘ पोलीस उपअधिक्षक डॉ.अरुण लोहार, पोलीस निरीक्षक कमलेश, सोनटक्के, अमित हहारे, आदी उपस्थित होते.