मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
अधिकमासाचा अवचित साधून भंडाऱ्यामध्ये आर्ट ऑफ लिविंग संस्था च्या माध्यमातून आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांद्वारे वर्षातून एकदा होत असलेल्या आनंद उत्सव तसेच सहादिवशीय आनंद अनुभूती शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सहा दिवशीय आनंद अनुभूती शिबिरात भंडारा वासियांना ध्यान, प्राणायाम तसेच 180 पेक्षा जास्त देशात प्रचलित असलेली सुदर्शन क्रिया अनुभव करायला मिळेल.विशेष म्हणजे या शिबिराच्या शेवटच्या दिवशी आर्ट ऑफ लिविंग संस्थापक परमपूज्य श्री श्री रविशंकर जी यांच्यासोबत लाईव्ह सेशन तसेच प्रश्न उत्तर होणार आहे. आनंद अनुभूती शिबिरामुळे विशेषतः झोपेची गुणवत्ता वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, दैनंदिन जीवनात जोश व ऊर्जा वाढते, मनाची एकाग्रता, निर्णय क्षमता वाढते, नकारात्मक भावनांवर नियंत्रण, नातेसंबंध, मैत्री व सामाजिकता मजबूत होते. भंडाऱ्यातील जास्तीत जास्त लोकांनी या आनंद अनुभूती शिबिराचा लाभ घ्यावा यासाठी दिनांक 8 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या सप्ताहामध्ये भंडाऱ्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे शिबिर घेण्यात येत आहे. हे सहा दिवसीय शिबिर श्रीमती विद्या इंगोले आणि मोनिका इंगोले यांच्या सानिध्यात खांब तलाव परिसर , बहिरिंगेश्वर मंदिर भंडारा, अर्चना नंदनवार यांच्या सोबत शारदा माता मंदिर, सरकारी रुग्णालयाच्या मागे, संगीता चौधरी यांच्या सोबत आर्य समाज हॉल तसेच कांचन हटवार यांच्यासोबत तेली समाज हाल, पाण्याच्या टाकी जवळ भंडारा येथे घेतले जाणार आहेत.बदलत्या वातावरणामध्ये आपलं शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहावं तसेच अनेक प्रकारच्या रोगांपासून आपला बचाव व्हावा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावे यासाठी जास्तीत जास्त संख्येने या सहा दिवसीय आनंद अनुभूती शिबिरामध्ये सहभागी होऊन स्वास्थ लाभ घ्यावा हे आवाहन आर्ट ऑफ लिविंग परिवार चे सर्व कार्यकर्ते आणि प्रशिक्षकांद्वारे करण्यात येत आहे.


