मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या समस्या व रिक्त असलेली पदे तत्काळ भरण्यात यावा. यासाठी दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन शासकीय रुग्णालयीन चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना भंडारा जिल्हाध्यक्ष गौरी शंकर मस्के सचिव सुरज परदेशी, मुन्ना करचुरी गणेश निखाडे, मंगला ठोंबरे, बबन मानतुटे, राजकुमार दरेकर, अमन तांडेकर,यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना दिले की,भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक वर्षापासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची खाली पदे आहेत. अनेक कर्मचाऱ्यांची पदोन्नती झालेली नाही. पूर्वी बेड ची संख्या 250 होती. त्यावेळी मात्र 227 चतुर्थ श्रेणी कर्मचारी काम पाहत होते .आता या दवाखान्यात 500बेड झाले असून 227 चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदसंख्या मंजूर त्यापैकी 127 कार्यरत आहेत त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यावर अत्यंत कामाचा ताण पडतो. तसेच कर्मचाऱ्याकडून इतर कामे राबवून घेतली जातात हा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यावर अन्याय आहे. त्यामुळे तात्काळ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी. म्हणून नऊ ऑगस्ट क्रांती दिन भंडारा जिल्ह्या सामान्य रुग्णालय येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत, असे निवेदन जिल्हाधिकारी कुंभेजकरभंडारा यांना दिले आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)