कैलास श्रावणी
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद :- पावसाळा आला की अनेक आजाराची लागण होते पावसाळ्यामध्येच हें आजार वाढीस लागतात जसे की, डोळ्याचे आजार, सर्दी, ताप, हिवताप,मलेरिया, डेंगू, टायफाईड, इत्यादी आजार प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये जोर धरताना दिसतात किंवा वाढीस लागतात, त्याचप्रमाणे आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यात पुसद तालुक्यामध्ये व स्थानिक गाव पातळीवर डोळ्यांचा फ्लू या आजाराची लागण झाल्याचे फार मोठ्या प्रमाणात लक्षणे दिसत आहेत. नागरिकांनी मुळीच घाबरून जाऊ नये, घरातील ज्या व्यक्तींना, डोळ्याची लागण झाली आहे त्या व्यक्तीने, इतर व्यक्तीपासून दूर राहावे, त्या व्यक्तीने डोळ्याला काळा चष्मा लावावा, डोळ्याला हात लावू नये, किंवा चोळू नये, डोळ्याची लागण झालेल्या व्यक्ती वापरत असलेले रुमाल, टावेल, बेडशीट, साबण इतरांनी ते वापरू नये त्यापासून संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे.तसेच आपण स्वतः नेत्ररोग तज्ञ,यांच्याकडे जाऊन सल्ला घ्यावा, तसेच उपचार करून औषधी नियमित घ्यावी. हा व्हायरस असून, याचे प्रमाण कमी होण्यासाठी कमीत कमी पाच ते सात दिवसाचा कालावधी लागतो, आपण स्वतः जाऊन मेडिकल मधील कोणतेही औषध घेऊ नये, व डोळ्यात टाकू नये, यामध्ये प्रामुख्याने नेत्ररोग तज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा असे आवाहन,. डॉ. रामचंद्र राठोड त्यांनी समस्त नागरिकांना केले आहे. काळजी घ्या, डोळ्यांची निगा राखा, नेत्ररोग तज्ञाचा सल्ला घ्या, व नियमित उपचार सुरू ठेवा, आपण निरोगी राहून इतरांनाही निरोगी ठेवा.!