भारत भालेराव
तालुका प्रतिनिधी,शेवगाव
शेवगाव :शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ.अभय देशपांडे आणि त्यांच्या पत्नी डॉ.आदिती देशपांडे यांच्या प्रभाकर क्लिनिकचा स्थलांतर आणि नूतन इमारतीचे उद्घाटन विदर्भरत्न रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक व ह.भ.प.दिनकर महाराज अंचवले वरूर यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला.यावेळी शहरातील डॉ.विनायक हाडके,श्री.अँड.विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे साहेब,श्री.अरुण पाटील लांडे,श्री संजय फडके पाटील,सुनील उर्फ बंडू शेठ रासने, बापूसाहेब गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी बोलतांना ढोक महाराज यांनी प्रभाकर हाॅस्पिटलचे संचालक डॉ. अभय देशपांडे व डॉ.अदिती देशपांडे दांपत्याला भविष्यात आपल्या हातून उत्तम आरोग्य सेवा घडो.सर्वांना निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली.यावेळी बोलतांना डॉ.अभय देशपांडे यांनी रुग्ण सेवा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे गेल्या 25 वर्षांपासून अहोरात्र आरोग्य सेवा करून शहरासह तालुक्यातील गोरगरीबांची सेवा करण्याचें व्रत हाती घेतले आहे असे सांगितले.यावेळी व्यापारी विजयकुमार डहाळे,कुमार शेठ,प्रा.शरद देशपांडे,अंबादास देशपांडे,प्रकाश देशपांडे,प्रवीण देशपांडे,प्रमोद देशपांडे,सुरेश बोरुडे पाटील,राजेंद्र भंडारी, पी.डब्ल्यू.डी.चे अरुण कुलकर्णी साहेब,फुलचंद अण्णा रोकडे, पोषान्ना कडमींचे,नारायण बैरागी,गणेश कळंबे,यांच्यासह बाजारपेठेतील व्यापारी,प्रतिष्ठीत नागरिक,वैद्यकीय,सामाजिक,शैक्षणि क क्षेत्रातील मित्रपरिवार,आदी मान्यवर उपस्थित होते.शेवटी डॉ.अदिती देशपांडे मॅडम यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.


