सुनिल गेडाम
तालुका प्रतिनिधी, सिंदेवाही
सिंदेवाही : समाजिक वनीकरण सिंदेवाही वनपरीक्षेत्र अधिकारी एम.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा,आंबोली,वासेरा,व मिनघरी या ठिकाणी पंचायत वन उद्यानाच्या कामाला स्वातंत्र्य दिनापासून वृक्ष लागवड करून सुरवात करण्यात आली,वृक्षाचे मानवी जीवनात महत्व वाढायला लागेल असल्याने प्रत्येक मनुष्याने आपल्या आयुष्यात एक तरी झाड लावलेच पाहिजे असा मार्मिक संदेश या वृक्ष लागवडी बाबत देण्यात आला, पंचायत वन उद्यान काही दिवसात च नागरिकासाठी सुरु होणार असून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी सुद्धा इथे लागवड केलेल्या वृक्षाची जोपासना करण्यात मदत करावी असे आव्हान करीत आबोली स्थित असलेल्या पंचायत वन उद्यानाच्या कार्यक्रमाचे उदघाटक सिंदेवाही नगर पंचायत चे नगरध्यक्ष स्वप्नील कावळे यांनी सर्व नागरिकांना आव्हान केले,या कार्यक्रमाला मौजा आंबोली स्थित नागरिक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील विध्यार्थी आवर्जून उपस्थित होते,विध्यार्थी व नागरिकांना मार्गदर्शन करताना एम.गायकवाड वन परीक्षेत्र अधिकारी म्हणाले,की हे नुसते उद्यान नसून एक तुम्हा सर्वांना वृक्षाच्या स्वरूपात मित्र देत आहोत आज जर तुम्ही यांना जपलं,तर येणाऱ्या काळात हेच तुम्हाला जपतील,यांचं संगोपन करण्याची जेवढी आमची जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी आपणही स्वीकारावी असे आव्हान केले,यानंतर नगरध्यक्ष स्वपिल कावळे यांच्या हस्ते या उद्यानाची पायाभरणी स्वरूपाने वृक्ष लागवड करण्यात आली,उद्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन समाजिक वनीकरण विभाग सिंदेवाही चे वनरक्षक मुलमूले यांनी केले, या कार्यक्रमाला अंबादास दुधे, रुपेश पेंदाम यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
“महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण सिंदेवाही च्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना गावाच्या विकासात भर पाडणारी असून यामुळे स्वास्थ जपण्यास मदत होणार आहे. पंचायत वन उद्यान मध्ये १८ महिने वयाच्या झाडांची लागवड करण्यात आली असून परिसर हिरवेगार होणार आहे. वृक्ष मोठे झाल्याबरोबर याठिकाणी नागरिकांसाठी सकाळ सायंकाळी फिरण्यासाठी ट्रॅक बनणार आहेत,या उद्यानाचा उपयोग तालुक्यातील नागरिकांना होणार आहे तरी वृक्ष संगोपन करण्यासाठी आपल्या परीने नागरिकांनी पुढे येऊन वृक्ष जगले पाहिजे याची काळजी घ्यावी.”
- स्वप्नील कावळे ( नगरध्यक्ष स्वप्नील कावळे नगर पंचायत सिंदेवाही)










