सुरज वाघुले
शहर प्रतिनिधी, श्रीरामपूर
टाकळीभान : राज्याचा पाण्याचा प्रश्न सोडायचा असेल तर तेलंगाना सरकारचा पॅटर्न आपल्या राज्य सरकारने राबवावा असे प्रतिपादन टाकळीभान येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे बीआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी प्रसंगी केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामस्थ अण्णासाहेब दाभाडे होते. यावेळी कार्यक्रम प्रसंगी अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, दत्तात्रय नाईक,भोकर सोसायटीचे चेअरमन गणेश छल्लारे, अशोकचे संचालक माऊली पटारे, अमोल कोकणे,मार्केट कमिटीचे संचालक किशोर बनसोडे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी मुरकुटे पुढे बोलताना म्हणाले की तेलंगणा सरकार हे किसान राज्य व शेतकऱ्यांचे कल्याणाचे सरकार असून विविध योजना सरकारने जनतेसाठी अमलात आणल्या आहेत. त्या वाखाण्याजोग्या आहेत.यामध्ये सुशिक्षित बेरोजगारास बिनव्याजी व्यवसायासाठी दहा लाखापर्यंत कर्ज, मागास व्यवसायिकासाठी बिनव्याजी दहा लाखापर्यंत कर्ज, विधवा, परीतकत्या महिलांना प्रतीमहा,तीन हजार रुपये मानधन ,शेतकऱ्यासाठी खरीप व रब्बी हंगामासाठी प्रत्येकी पाच, पाच हजार रुपये अनुदान आहे. त्याचप्रमाणे मुलगा झाल्यास १२ हजार रुपये व मुलगी झाल्यास १३ हजार रुपये खर्चासाठी व केसीआर किट सह महिलेस दिले जाते. तसेच मुलीच्या लग्नासाठी एक लाख 11 हजार सहाशे रुपये मुलीच्या नावाने टाकले जातात. व पूर्ण शिक्षण होईपर्यंत विनामूल्य मोफत शिक्षण दिले जाते. तसेच विदेशात शिक्षण घेण्यासाठी वीस लाख रुपये दिले जातात. तसेच मयत व्यक्ती पाच लाख रुपये देण्याची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. प्रमाणे शेतीसाठी २४तास वीज फुकट असून सर्व पिकांना भावाची हमी सरकारमार्फत देण्यात आली आहे तेथील निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे व सर्व समावेशक आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाहीत. नऊ वर्षानंतर स्वतंत्र राज्य झाल्यानंतर या राज्याने उल्लेखनीय अशी प्रगती केली आहे.राज्याचे दरडोई उत्पन्न व जीडीपी दर सर्वात चांगला असून देशामध्ये एक क्रमांक चे राज्य म्हणून गणले जात आहे. या ठिकाणचे आयटी हब परदेशातील देशांना लाजविल असे असून आयटी क्षेत्रात भरीव प्रगती या राज्याने केली आहे. सर्व शासकीय व्यवस्था ऑनलाईन असून तलाठी मुक्त गावे असून खरेदी विक्रीचे व्यवहारही ऑनलाईन पद्धतीने होतात. तसेच या राज्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी वर मोठे बंधारे केले असून लोखंडी फळ्यांद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी अडवले आहे. त्याच प्रकारचे काम कृष्ण नदीवरही चालू केले आहे. जवळजवळ 600 टीएमसी पाणी या राज्याने या बंधाऱ्यांद्वारे अडविले असून त्यातून मोठी वीज निर्मिती केली आहे तसेच त्यातून तलाव, कालवे यांची व्यवस्था केली असून 80 टक्के क्षेत्र या राज्यातील बागायत आहे. त्याचप्रमाणे गाव वाड्या वस्त्यांवर नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था देखील मोफत दरात केली आहे. तेलंगाना हे प्रगतशील राष्ट्र असून इतर राज्यांना दिशा दर्शक आहे असे मुरकुटे यावेळी म्हणाले. यावेळी बीआरएस पक्षाने तेलंगणा राज्यात केलेल्या सुविधांची माहिती लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनीही दिली. यावेळी आपकी बार किसान सरकारच्या घोषणाही देण्यात आल्या. प्रसंगी बीआरएस पक्षाच्या जिल्हा समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल मयूर पटारे यांचा सत्कार करण्यात आला तसेच भारतीय सैन्य दलामध्ये अग्नीवीर पदावर निवड झालेले जयदीप परदेशी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाराजी पटारे यांनी केले.आभार मार्केट कमिटीचे संचालक मयूर पटारे यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी सरपंच अर्चनाताई रणनवरे, ग्राम. सदस्य अर्चना पवार,दत्तात्रय नाईक, दत्तात्रय मगर, यशवंत रणनवरे,शंकरराव पवार ,भाऊसाहेब पटारे,सुनील बोडखे, सुनील त्रिभुवन, बाबासाहेब थोरात,एकनाथ पटारे, बाळासाहेब आहेर,संजय रणनवरे,दत्तात्रय बोडखे, आबासाहेब बोडखे, महेश लेलकर,संजय पटारे, प्रकाश नाईक, मच्छिंद्र कोकणे,बद्रीनाथ पटारे, सुनील भरींडवाल,दिलीप पटारे, कपिल लेलकर, गणेश लेलकर,शिवाजी पटारे,आदी सह ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट: टेल टॅंक मध्ये मध्ये पाणीच आले नाही तर ड्रिप कशावर चालणार असा सवाल मुरकुटे यांनी यावेळी केला. टेल टॅंक दरवर्षी भरण्यासाठी त्यामध्ये पाणी आणून टाकण्याची व्यवस्था अगोदर करावी लागेल तसेच गोदावरी पात्रातून पाईपलाईन करून टेल टॅंक मध्ये पाणी टाकता येईल असा पर्यायही त्यांनी सुचविला.


