कैलास पाटेकर
ग्रामीण प्रतिनिधी,ढोरजळगाव
ढोरजळगाव : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव ग्रामपंचायत च्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या घंटागाडीची पूजन भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस श्री बापूसाहेब पाटेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.
गावातील कचरा गावाबाहेर टाकून योग्य प्रकारे विल्हेवाट लागावी,तसेच गावांमध्ये ग्राम स्वच्छता राहावी.गावातील नागरिकांच्या आरोग्य चांगले राहावे यासाठी ढोरजळगाव ग्रामपंचायत च्या वतीने ही घंटागाडी सुरु करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी आपल्या घरातील कचरा दैनंदिन इतरत्र न टाकता घंटागाडीतच टाकून सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच सौ रागिनी लांडे यांनी केले आले.यावेळी डॉक्टर सुधाकर लांडे, मा उपसरपंच राजेंद्र देशमुख,महादेव पाटेकर, राजेंद्र शेळके, दीपक ननवरे,देविदास गिऱ्हे,गणेश पाटेकर,साईनाथ गरड, रोहन साबळे, विष्णुपंत गरड,भगवान गरड,भाऊसाहेब गरड,दिगंबर साबळे,श्रीधर पाटेकर,गणेश गरड, पांडुरंग सांगळे,अभिजीत लांडे,ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब बडे,अतुल लांडे,भगीरथ वाघमारे,भीमराव साबळे,पिंटू तुजारे आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.