शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी, नांदुरा
काल दि 25/07/2023 ला वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा नेते, समाजभुषण प्रशांत वाघोदे, ता.अध्यक्ष समाधान डोंगरे, ता. महासचिव विशाल मोरे यांच्या एका हाकेला अगदि वेळेवर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोताळा फाट्यावर हजर झाले. याचे कारण असे की, गेल्या काही दिवसांपासून मोताळा तालुक्यात काही संघटनांद्वारे सर्व सामान्यांना खुप त्रास होत आहे, कुठे मारझोड तर कुठे दादागिरी करून दबाव आणला जात आहे.
हे लक्षात आल्यावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते आदरणीय प्रशांत भाऊ यांच्या नेतृत्वात बोराखेडी पोलीस स्टेशन ला शेकडो कार्यकर्ते हजर झाले .ठाणेदार मा. बळीराम गिते साहेब यांच्या शी झालेल्या दोन तास चर्चेत प्रशांत भाऊ यांनी सांगितले आपण जसे की,मोताळ्यात न राहता युपी बिहार मध्ये असल्याची फिलींग सध्या येत आहे. तरी कायदा व सुव्यवस्था बिघडवणार्या संघटनांना आळा घातल्या गेला नाही तर संबंधित संघटनेला वंचित स्टाईल ने धडा शिकवु व लवकरच बंदुक मागणीसाठी मोताळा ते बुलढाणा मार्च काढु अशी सक्रीय चर्चा या माध्यमातून करण्यात आली. त्यावेळी प्रतिक्रिया देताना मा .ठाणेदार साहेब म्हणाले कि, जर काही घटना घडली तर 112वर काॅल करा नक्कीच पंधरा मिनिटात मदत पोहोचेल,गुन्हेगाराची जात नसते गुन्हेगार हा गुन्हेगार च असतो त्याला कुठेही पाठीशी घातल्या जाणार नाही.
या वेळी,समाधान डोंगरे ता अध्यक्ष , विशाल मोरे ता.महासचिव,प्रशांत बोदडे, जितेंद्र तायडे, संदिप गवई, लाला गवई, नवनित सिरसाट, शेषराव उमाळे, राष्ट्रपाल खंडारे, अमोल गवई, युवराज भिडे, सागर धुरंदर, मुकेश ईंगळे, विशाल चव्हाण ,सुनिल सुरडकर, जितुभाऊ खराटे, साबिरभाई, वकिल भाई, मोठ्या संख्येने कार्यकर्ते व बहुजन समाजातील तरूण आणी मुस्लिम समाजातील मौलाना, धा बढे येथील आरिफ पठाण, व तरूण उपस्थित होते.