संजय भोसले
तालुका प्रतिनिधी,कणकवली
कणकवली : भाजपा ओबीसी मोर्चा व दक्षिण मुंबई भाजपा अध्यक्ष विजय घरत याच्या वतीने जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघात संगणक व वह्या वाटप कार्यक्रम, विविध शाळांमध्ये संपन्न झाला.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विद्यार्थी संपुर्ण महाराष्ट्रात अव्वल स्थानी असतात. त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे या हेतुने मी सिंधुदूर्गात वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करत असल्याचे विजय घरत यानी याप्रसंगी सांगितले .यावेळी देवगड तालुक्यातील मुटाट घाडीवाडी येथील अंगणवाडी व वैभवाडी तालुक्यातील तालुक्यातील नडगिवे,कणकवली तालुक्यातील खारेपाटण शाळा क्र.१ या शाळेस आमदार श्री नितेशजी राणे यांच्या हस्ते संगणक व इतर शाळात वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी पडेल सरपंच भूषण पोकळे,माजी उपसभापती मिलिंद मिस्त्री,वागदे सरपंच संदिप सावंत,बाबु आडिवरेकर,बाबु घाडिगावकर व बंधु , रंजित घाडिगावकर,माजी सरपंच,शाळेंचे मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख ,ग्रा.पं.सदस्य,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान १ ली ते ७ वी तील श्रीराम माध्यमिक विद्या मंदीर पडेल, देवगडसह येथील ४ शाळेस,वागदे येथील शाळेस,बोर्डवे येथील नाथपंथीय गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ संचालित अनाथ आश्रम शाळा असे मिळून एकुण एक हजार विद्यार्थ्यांना जम्बोबुक, वह्या व ड्राईंगच्या विशेष वह्या प्रदान करण्यात आल्या.यावेळी या उपक्रमास सहकार्य करणा-या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.