विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : तालुका शेतकरी जिनिग अँड प्रेसिग ची निवडणूक काल पार पडली यामध्ये सत्यशोधक पॅनल विजयी झाले यामध्ये सत्यशोधक पॅनल ने सोळा पैकी नऊ जागेवर विजय मिळवला असून महविकास आघाडीला सात जागेवर समाधान मानावे लागले आहे.अहंकाराचा पराभव झाला व सत्याचा विजय झाला असे मत माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी व्यक्त केले या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाने खूप मोठी मोठी आश्वासन देऊन जनतेचे मत मिळवण्याचा प्रयत्न केला पण जनतेनं यावेळेस सत्याला साथ देवुन आम्हाला विजयी केले त्याबद्दल जनतेचे आभार मानतो असे मत प्रकाश पाटील देवसरकर यांनी व्यक्त केले सत्यशोधक पॅनल चे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे १)चीतांग्राव कदम २)जितेंद्र पवार ३)कपिल चौहान ४)आनंदराव राणे ५)श्रीराम कदम ६)शिवाजी माने ७)अवधूत देवसरकर ८)रेणुका माने ९)चंद्रदीप देवसरकर


