नागसेन अंभोरे
तालुका प्रतिनिधी बाळापूर
अकोला :- जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील
देगाव येथे दि.20.06.2023 गुरुवार रोजी प्रा.धनंजय मते यांच्या वाढदिवसानिमित्त ग्राम देगांव येथील युवक अंकुश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली व पर्यावरण संघटनेच्या वतीने सरांच्या वाढदिवसानिमित्त स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण करण्यात आले .पावसाची अनियमितता,वाढते प्रदूषण, दिवसेंदिवस वाढणारे पाण्याचे संकट,याचा विचार करता कोणत्या ना कोणत्या माध्यमातून वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करून जगविने काळाची गरज बनली आहे. याचं माध्यमातून व स्मशान भूमीत सौंदर्य वाढवण्याकरिता. वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगजीवनराम कातखेडे तसेच शेख शाहरुख, रामेश्वर धानोकर,वैभव पिंपळे,तथागत अंभोरे,तेजस इंगळे यांनी परिश्रम घेऊन सहकार्य केले.तसेच गावातील इतर युवक उपस्थित होते.


